Samantha Ruth Prabhu: सामंथाच्या होणाऱ्या बाळाच्या नावाची फॅनने दिली भन्नाट आयडिया; अभिनेत्रीने दिलं मजेशीर उत्तर
Samantha Ruth Prabhu सामंथाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट करत मुलगा किंवा मुलगी झाल्यास कोणती नावे ठेवता येतील, याची गंमतीदार कल्पना मांडली.

Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर तिच्या एका पोस्टवर चाहत्याने केलेली कमेंट आणि त्यावर सामंथाने दिलेला मजेशीर रिप्लाय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. एका चाहत्याने सामंथा आणि राज निदिमोरु यांच्या नावावरून त्यांच्या होणाऱ्या बाळासाठी नाव सुचवलं. त्यावर सामंथाने भन्नाट अंदाजात प्रतिक्रिया दिली.
फॅनने सुचवलं ‘समायरा’ आणि ‘समराज’ नाव
सामंथाने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट करत मुलगा किंवा मुलगी झाल्यास कोणती नावे ठेवता येतील, याची गंमतीदार कल्पना मांडली. चाहत्याने मुलीसाठी ‘समायरा’, तर मुलासाठी ‘समराज’ हे नाव सुचवलं. सामंथा आणि राज या दोघांच्या नावांचा मिलाफ करून ही नावे तयार करण्यात आली होती. कमेंटमध्ये चाहत्याने सामंथाला स्वतःची काळजी घेण्याचा सल्लाही दिला.
सामंथाचा मजेशीर रिप्लाय
चाहत्याच्या या कमेंटवर सामंथानेही विनोदी पद्धतीने प्रतिक्रिया दिली. ‘समराज’ या नावाचा उल्लेख करत तिने विचारलं की, हे नाव थोडं जास्तच स्वतःभोवती केंद्रित वाटत नाही का? सामंथाच्या या उत्तरासोबत हसण्याचा इमोजीही होता. तिच्या या मजेशीर प्रतिक्रियेला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोशल मीडियावर तिच्या उत्तराची चर्चा सुरू झाली आहे.
Samantha Ruth Prabhu
प्रेग्नन्सीबाबत सामंथाने केली होती चर्चा
सामंथाने अलीकडेच सोशल मीडियावर ‘आस्क मी एनीथिंग’ म्हणजेच AMA सेशन घेतलं होतं. या माध्यमातून तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. या संवादादरम्यान तिने मातृत्वाशी संबंधित तयारीबाबतही काही गोष्टी शेअर केल्या. बाळासाठी आवश्यक असलेल्या अनेक वस्तू खरेदी केल्या असून त्या सगळ्या वस्तू पाहून आता थोडी भीती वाटत असल्याचे तिने मजेशीरपणे सांगितले. सामंथाने होणाऱ्या आणि नुकत्याच आई झालेल्या महिलांनाही शुभेच्छा दिल्या. तिच्या या संवादामुळे चाहत्यांना तिच्या वैयक्तिक आयुष्याची काहीशी झलक पाहायला मिळाली.
राज निदिमोरुसोबतच्या नात्यामुळेही चर्चेत
सामंथा रुथ प्रभू आणि राज निदिमोरु यांच्या नात्याबाबत गेल्या काही काळापासून चर्चा सुरू होत्या. गेल्या डिसेंबर मध्ये दोघांनी लग्न केलं. आणि आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघे डिसेंबरमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करू शकतात. मात्र, या वृत्ताला सामंथा किंवा राज यांच्या बाजूने अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे सध्या या संदर्भातील माहिती रिपोर्ट्सपुरतीच मर्यादित आहे.
चाहत्यांना आवडला सामंथाचा अंदाज
सामंथा अनेकदा सोशल मीडियावर चाहत्यांशी संवाद साधताना दिसते. तिच्या पोस्टवर चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत असतात. यावेळी एका चाहत्याने थेट बाळाच्या नावाची कल्पना सुचवल्याने ही कमेंट चर्चेत आली.
विशेष म्हणजे, सामंथाने त्या कमेंटकडे दुर्लक्ष न करता त्यावर विनोदी उत्तर दिले. तिच्या या हलक्याफुलक्या अंदाजामुळे चाहत्यांनाही मजा आली. सध्या सोशल मीडियावर सामंथाचा ‘समराज’वरील रिप्लाय चांगलाच चर्चेत आहे.





