Films Releasing in June and July : २०२६ ची सुरुवात मोठ्या बजेटच्या चित्रपटांनी झाली. काही चित्रपटांना यशही मिळाले; मात्र सध्या सुरू असलेल्या आखाती देशातील युद्धाची झळ मनोरंजन सृष्टीला बसत आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठ्या चित्रपटांनी आपल्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलल्या आहेत. सुपरस्टार यशच्या बहप्रतिक्षेत टॅाक्सिक चित्रपट मार्च महिन्यात रिलीज होणार होता. पण चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. खरंतर मार्च-एप्रिल महिन्यात विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने मे महिन्यात मोठे चित्रपट रिलीज करण्याकडे कल असतो. यंदा मात्र मे महिन्यात चार ते पाच चित्रपट वगळता इतर कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होणार नाही. मात्र, पुढच्या दोन महिन्यात दमदार चित्रपट प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज असणार आहेत. टॉक्सिक Films Releasing in June and July Toxic Movie केजीफ आणि केजीएफ २ नंतर सुपरस्टार यशचा टॅाक्सिक हा आगामी चित्रपट आहे. हा चित्रपट १९ मार्चला प्रदर्शित होणार होता. मात्र, निर्मात्यांनी अचानक प्रदर्शनाची तारीख बदलली. पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे त्यांनी प्रदर्शनाची तारीख ४ जूनपर्यंत पुढे ढकलली असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितले. है जवानी तो इश्क होना है Films Releasing in June and July Hai Jawani Toh Ishq Hona Hai वरुण धवनचा “है जवानी तो इश्क होना है” हा चित्रपट १२ जून रोजी प्रदर्शित होणार असून, या चित्रपटात त्याच्यासोबत मृणाल ठाकूर आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा मैत्री आणि प्रेम या दोन संकल्पनावर आधारित असल्याचे बोलले जाते. डेव्हिड धवन चित्रपट दिग्दर्शित करत असून, रमेश तोरानी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हेही वाचा : Induction Cooktop: इंडक्शनवर अॅल्युमिनियम कढई का चालत नाही? जाणून घ्या योग्य भांडी आणि सोपा मॅग्नेट टेस्ट! आय विल कम बॅक I will be back दिलजीत दोसांझचा ‘आय विल कम बॅक’ हा चित्रपटदेखील १२ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रेमकथेवर आधारित आहे. दिलजीत दोसांझसोबत शर्वरी, वेदांग रैना आणि नसीरुद्दीन शाह हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अली यांनी केले असून, समीर नायर आणि दीपक सेहगल यांनी निर्मिती केली आहे. कॉकटेल २ तब्बल १२ वर्षानंतर कॅाकटेल चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कॅाकटेल २ ची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे. हा चित्रपट जून महिन्याच्या मध्यात १९ तारखेला प्रदर्शित होईल. शाहिद कपूर, रश्मिका मंदाना आणि क्रिती सेनॅान या तिघांभोवती कथा गुंफण्यात आली आहे. होमी अदजानिया दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्स या बॅनरखाली करण्यात आली आहे. वेलकम टू द जंगल हा चित्रपट २६ जूनला प्रदर्शित होणार असून, चित्रपटात कलाकारांची मांदियाळी असणार आहे. अक्षय कुमार, सुनील शेट्टी, अनिल कपूर, संजय दत्त, हर्षद वारीसी यांच्यासह इतर अनेक कलाकार आहेत. या चित्रपटाची निर्मिती फिरोज नाडियादवाला आणि ज्योती देशपांडे यांनी केली आहे. तर दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे. धमाल ४ या चित्रपटाची चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहत आहेत. अखेर मोठ्या प्रतिक्षेनंतर ३ जुलैला हा चित्रपट प्रदर्शित आहे. इंद्र कुमार दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण, भूषण कुमार, क्रिशन कुमार, अशोक ठाकेरिया आणि कुमार मंगत पाठक यांनी संयुक्तपणे केली आहे. अल्फा आलिया भट्टचा बहुचर्चेत हा चित्रपट १० जुलैला प्रदर्शित होण्याची शक्यता असून, प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ यांच्या मुख्य भूमिका आहेत. यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात बॉबी देओल आणि अनिल कपूर देखील दिसणार आहेत .चित्रपटाचे दिग्दर्शन शिव रावल यांनी केले आहे. तर आदित्य चोप्रा निर्माते आहेत. रफ्तार राजकुमार रावचा आगामी चित्रपट हा रफ्तार असून २४ जुलैला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि कीर्ती सुरेश मुख्य भूमिकेत आहेत. ‘रफ्तार’चे दिग्दर्शन आदित्य निंबाळकर यांनी केले असून, एमजीएम स्टुडिओजच्या बॅनरखाली पत्रलेखा आणि ॲमेझॉनने यांनी निर्मिती केली आहे. हेही वाचा : India condemns pakistan: “हे सहन केले जाणार नाही…” ; पाकिस्तानच्या काबूलवरील हवाई हल्ल्यानंतर भारताची संतप्त प्रतिक्रिया