बिबवेवाडी (पुणे) – गणेशोत्सव काळात ‘मैत्रीच्या गणपती’ला भाविकांकडून मिळालेल्या दानातील तब्बल दीड लाख रुपये भिवरी येथील ‘गुरुमाँ डॉ. मंजूश्री गोशाळे’ला अर्पण करण्यात आले. प्रमुख उद्योगपती मनोज छाजेड यांच्या वाढदिवसानिमित्त दानपेटीतील सर्व रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. या कार्याचे समाजात सर्वत्र कौतुक होत आहे. या प्रसंगी मैत्रीच्या गणपतीचे प्रमुख मनोज छाजेड, गोशाळेचे अध्यक्ष ललित जैन, मुकेश छाजेड, रमणलाल शिंगवी, डॉ. सुमतीलाल लोढा, प्रकाश संचेती, जीवन बेद, योगेश मोहोळ, उमेश पाथरकर, शीतल भंडारी, नीरज कांकरीया, सिद्धांत छाजेड, संदेश कदम, महेश सावंत, मनोज रावत आदी मान्यवर उपस्थित होते. सिद्धी फाऊंडेशनच्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, वृक्षारोपण, गोरगरिबांना मदत असे अनेक उपक्रम नियमित राबविले जातात. संस्थापक अध्यक्ष मनोज छाजेड हे जीतो, लायन्ससह विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय असून, समाजकार्यात अग्रणी भूमिका बजावत आहेत. छाजेड म्हणाले, “भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेली रक्कम सामाजिक व धार्मिक हितासाठी वापरण्याचा आमचा निर्णय आहे. या माध्यमातून समाजोपयोगी कार्यात खारीचा वाटा उचलल्याचा आनंद वाटतो.” तर ललित जैन यांनी छाजेड यांचा गौरव करताना सांगितले, “समाजहिताचा विचार करून गोशाळेस दिलेली मदत हा उपक्रम कौतुकास्पद आहे. छाजेड परिवार गेले १८ वर्षे ‘मैत्रीचा गणपती’ उपक्रम साजरा करून कौटुंबिक नाती अधिक दृढ करीत आहेत.”