राजगुरुनगर : राजगुरुनगर शहराच्या परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोन युवकांच्या विरोधात बलात्कार व पॉस्को कायद्यांतर्गत खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजगुरुनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीचा कपडे बदलताना व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर मार्च २४ ते जून २०२४ या कालावधीत वेळोवेळी दोन युवकांनी मुलगी अल्पवयीन असतानाही तिच्यावर अत्याचार केला. यात सबंधित मुलगी गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या पालकांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन्ही युवकांवर बलात्कार व पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीपसिंह सिसोदे करीत आहेत.