पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांच्या अडचणीमध्ये वाढ ! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. पूजा खेडकर यांच्याशी संबधित असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कंपनीचा लिलाव केला जाणार आहे. यामुळे पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड शहरातील एमआयडीसी परिसरात पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या नावावर ही कंपनी आहे.
मनोरमा खेडकर यांच्या नावे असलेल्या थर्मोव्हेरिटा इंजीनियरिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने महानगरपालिकेचा लाखोंचा कर थकवला आहे. त्यामुळे, ही कंपनी कर संकलन विभागाकडून सील करण्यात आली होती. आता मात्र थकीत कर निर्धारित वेळेत न भरल्यास ही कंपनी लिलावत काढली जाणार आहे. लवकरच लिलाव प्रक्रियेला सुरुवात केली जाणार असल्याची माहिती कर संकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांच्ग्याकडून देण्यात आली आहे.
तसेच पिंपरी चिंचवड शहरातील अशाच पद्धतीने कर बुडविणाऱ्या इतर सुमारे 80 मालमत्तांचा देखील लिलाव केला जाणार आहे असेदेखील निलेश देशमुख म्हणाले आहेत. यामुळे पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.





