नववीतील मुलीचा नाचाचा सराव करताना हृदयविकाराने मृत्यू
Updated On:

बंगळुरू : वार्षिक स्नेहसंमेलमातील नृत्याचा सराव करताना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने नववीत शिकणाऱ्या एका मुलीचा मृत्यू झाला. बंगारपेट तालुक्यातील गोल्लाहळ्ळी येथे ही घटना घडली.
शाळेतील शिक्षकांनी त्याला तातडीने नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. त्यांनी त्याला मोठ्या रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली. त्यानुसार त्याला जलाप्पा रुग्णालयात नेण्यात आले.
तेथे दाखल करण्यापुर्वीच त्याचा मृत्यू आला. हा मृत्यू नैसर्गिक होता. या विद्यार्थीनीला हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता,असे डॉक्टरांनी सांगितले.





