राहुरी पोलीस उपनिरीक्षकांवर बलात्काराचा गुन्हा दाखल
Updated On:

नगर – राहुरीचे पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा यांच्यावर राहुरी पोलीसात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस दलात सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
राहुरी तालुक्यातील एका महिलेची व्हाट्सअप चॅटिंग द्वारे सज्जन नार्हेडा यांची ओळख झालेली होती.
त्या ओळखीचा गैरफायदा घेऊन राहुरी येथे स्टेशन रोडवर असलेल्या खाजगी रूमवर त्या पिडीतेला बोलावून तिच्यावर इच्छेविरुद्ध बलात्कार केला असून राहुरी पोलीस स्टेशन मध्ये काल रात्री पोलीस उपनिरीक्षक सज्जन नार्हेडा यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास राहुरीत नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी कसोशीने करावा अशी आता जनतेतून मागणी होत आहे.


