लाकडी दांडक्याने एकाला मारहाण मुर्तुडकर टोळीवर गुन्हा दाखल

नगर – लाकडी दांडक्याने एकाला मारहाण करून गंभिर जखमी केल्या प्रकरणी सागर मुर्तुडकर टोळीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सर्जापूरा परिसरात शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी जखमी गौस मोहम्मद गुलाम मोहम्मद शेख (वय-२७, धंदा-मजुरी, रा. बेलदार गल्ली ता. जि. नगर ) यांनी फिर्याद दिली आहे. सागर मुर्तुडकर, अमित सुरशे, ऋषी मुर्तुडकर, अनिल शेंडगे, प्रथमेश थोरात सर्व (रा-वंजारगल्ली अ, नगर) तसेच गणेश सुबे ( रा-दरेवाडी ता. जि-अ, नगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीला सगर मुर्तुडकरने मित्र सोनु म्हस्के याला फोन करून बोलावुन घेण्यास सांगीतले. सोनु म्हस्केने मी येतो असे म्हणून फोन कट केला. त्यानंतर सागर मुर्तुडकर याने फिर्यादीला दुचाकीवर बसण्यास सांगितले. दरमायन गणेश सुंबेने शिवीगाळ करून पाठीमागुन मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर सागर मुर्तुडकर यांच्यासह अमित सुरशे, ऋषी मुर्तुडकर, गणेश सुंबे, अनिल शेंडगे, प्रथमेश थोरात व ईतर पाच सहा जणांनी लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्याने मारहाण केली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे.





