हिंगोली : हिंगोलीचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बाहेरगावी असणाऱ्या मतदारांना येण्या-जाण्यासाठी फोन पे द्वारे पैसे पाठवा, असे वक्तव्य त्यांनी केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आमदार संतोष बांगर यांना 24 तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज खुलासा सादर केल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हिंगोलीच्या कळमनुरी येथे पार पडलेल्या शिंदे गटाच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना बाहेरील मतदारांचा आढावा घेण्यास सांगितले होते. त्यांना मतदानासाठी आणण्याची व्यवस्था देखील करण्याच्या सूचना केल्या होत्या. मतदारांना मतदानासाठी आणण्यासाठी त्यांना यूपीआयद्वारे पैसे पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल, असे वक्तव्य त्यांनी केले होते.