नवी दिल्ली, – भारताच्या स्थूल अर्थव्यवस्थेची आकडेवारी समाधानकारक असली तरी नोव्हेंबर महिन्यामध्ये पायाभूत सुविधा क्षेत्राचे उत्पादकता कमी होऊन केवळ 1.8 टक्के इतकी नोंद केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये या क्षेत्राचे उत्पादकता तब्बल 5.8% इतकी होती. खनिज तेल, नैसर्गिक वायू, तेल शुद्धीकरण, वीज निर्मिती इत्यादी क्षेत्रातील उत्पादकता कमी झाल्यामुळे या क्षेत्राच्या एकूण उत्पादकतेवर परिणाम झाला आहे. औद्योगिक उत्पादनात या क्षेत्राचा 40 टक्के वाटा असतो. त्यामुळे औद्योगिक उत्पादनाच्या आकडेवारीवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. दुसर्या तिमाहीचा विकासदर 8.2% इतका झाल्यानंतर आता औद्योगिक उत्पादन कमी झाल्यास दुसर्यात सहामाहीच्या विकासदरावर याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत या क्षेत्राची उत्पादकता केवळ 2.4% वाढले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत ही उत्पादकता 4.4% इतकी होती. ऑक्टोबर महिन्याच्या उणे 0.1% च्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यातील उत्पादन मात्र वाढलीआहे.