मुंबई – सध्या बायोपिकचा जमाना आहे. अनेक खेळाडू, गाजलेले अभिनेते, राजकीय नेते आणि अगदी कुख्यात गुंडांवरही बायोपिक बनून झाले आहेत. माजी पंतप्रधान दिवंगत नरसिंह राव यांच्या जीवनावरही आता एक बायोपिक बनणार आहे.
ही एक बायोपिक सिरीज असणार आहे आणि त्याचे डायरेक्शन दिग्गज डायरेक्टर प्रकाश झा करणार आहेत. तेलगू प्रोड्युसर अल्लू अरविंद हे या वेबसिरीजचे निर्माते असणार आहेत. नरसिंह राव हे दक्षिणेतील पहिले पंतप्रधान होते.
म्हणून दक्षिणेसाठी ही सिरीज महत्त्वाची असणार आहे. देशात नव्याने आर्थिक सुधारणा आणि जागतिकीकरणाचे धोरण त्यांच्याच कारकिर्दीत सुरू झाले. मात्र त्यांनी याचे श्रेय कधीच स्वतःकडे घेतले नाही. त्यामुळेच नरसिंह राव यांच्या जीवनातील असे अनेक पैलू आहेत, जे अद्याप प्रेक्षकांसमोर आलेले नाहीत.
ही बाजू राष्ट्रीय पातळीवर प्रेक्षकांसमोर येणे गरजेचे आहे. म्हणूनच ही वेबसिरीज बनवली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. नरसिंह राव हे स्वतः अनेक भाषा बोलू शकत होते. त्यामुळे त्यांच्या
जीवनावरील ही वेबसिरीजदेखील तेलगू, तमिळ आणि हिंदीमध्येही बनवली जाणार आहे. विनय सेतापती यांनी लिहिलेल्या हाफ लायन या पुस्तकावर ही सिरीज आधारलेली असणार आहे.