पुण्यात रिक्षाचालकाच्या अंगावर कोसळले मोठे झाड !

Updated On:

पुणे : शहरात सध्या सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. पुण्यातील रास्ता पेठ, केईएम रुग्णालया समोर मोठे झाड कोसळून रिक्षाचालकाच्या अंगावर पडले होते. याठिकाणी झाडाखाली अडकलेल्या रिक्षाचालकांची सुटका करण्यासाठी घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान तात्काळ दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने झाड हटवित रिक्षाचालकाची जखमी अवस्थेत सुटका केली. दरम्यान याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी देखील झाली होती. या घटनेत एकूण दोन व्यक्ती जखमी झाल्या असून मियालाल जमादार (वय  80 ), संगीता नेमसे (वय 34 ) अशी त्यांची नावे आहेत.  तसेच या घटनेत पाच चारचाकी, एक रिक्षा आणि एका सायकलीचे नुकसान झाले आहे.

हि कामगिरी अग्निशमन दलाचे अधिकारी प्रकाश गोरे, तांडेल राजाराम केदारी, चालक हनुमंता कोळी, राजू शेलार, जवान चंद्रकांत आनंदास, मंगेश मिळवणे, छगन मोरे, सचिन जौजाळे, प्रताप फणसे, प्रशांत गायकर, विठ्ठल शिंदे यांनी केली आहे.

आणखी संबंधित बातम्या

Pune News : शहरात अनधिकृत नळजोडांचा सुळसुळाट! अर्ध्या इंचाच्या ठिकाणी एक इंचाच्या जोडण्या

2026-11-22 18:39:34

Pune News : शहरात अनधिकृत नळजोडांचा सुळसुळाट! अर्ध्या इंचाच्या ठिकाणी एक इंचाच्या जोडण्या

Pune News : फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अतिक्रमणांवर कायमस्वरूपी तोडगा काढणार; सभागृह नेते गणेश बिडकर यांची प्रत्यक्ष पाहणी

2026-11-18 20:42:34

Pune News : फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अतिक्रमणांवर कायमस्वरूपी तोडगा काढणार; सभागृह नेते गणेश बिडकर यांची प्रत्यक्ष पाहणी

Accident News : बेळगावमध्ये भीषण अपघात! देवदर्शनास गेलेल्‍या तिघांचा दुर्दैवी अंत

2026-11-15 21:34:56

Accident News : बेळगावमध्ये भीषण अपघात! देवदर्शनास गेलेल्‍या तिघांचा दुर्दैवी अंत

Pune News : नातू, सुनेची अटक न्यायालयाने रोखली

2026-11-15 16:38:31

Pune News : नातू, सुनेची अटक न्यायालयाने रोखली

CNG Price Hike : रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार! मध्यरात्रीपासून सीएनजीचे नवे दर होणार लागू

2026-11-14 18:26:41

CNG Price Hike : रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागणार! मध्यरात्रीपासून सीएनजीचे नवे दर होणार लागू