नवी दिल्ली, दि. 17- जागतिक बाजारात सोन्याचे दर वाढल्यामुळे मंगळवारी भारतीय सराफात सोन्याच्या दरात बरीच वाढ नोंदली गेली.
दिल्ली सराफात सोन्याचा दर 446 रुपयांनी वाढून 46,460 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याचबरोबर तयार चांदीचा दर 888 रुपयांनी वाढून 62,452 रुपये प्रति किलो झाला.
या घटनाक्रमाबाबत बोलताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की जागतिक पातळीवर डेल्टा या करोना व्हायरसचा प्रसार वाढत असल्यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूकीकडे वळू लागले आहेत.
त्यामुळे सोन्याची खरेदी वाढून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. जागतीक बंजारात सोन्याचा दर 1,793 डॉलर व चांदीचा दर 23.80 डॉलर प्रति औंस झाला.