Mumbai Best Bus Accident| मुंबईतील भांडूप रेल्वे स्टेशन परिसरात सोमवारी रात्री झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. तर या घटनेत 10 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना राजावाडी आणि एमटी अग्रवाल रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कामावरून घरी जात असताना रात्री साडेनऊ वाजता गर्दीच्या वेळी हा अपघात झाला आहे. बेस्ट बसच्या अपघातामधील मृतांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश असल्याचे माहिती पोलिसांनी दिली आहे. नेमका कसा घडला अपघात? भांडूप पश्चिम रेल्वे स्टेशन बाहेर काही प्रवासी रस्त्याच्या कडेला उभे होते. तेव्हा 606 क्रमांकाच्या बेस्ट बसचा चालक यू टर्न घेत होता, त्यावेळीच नियंत्रण सुटले आणि बस प्रवाशाच्या रांगेत शिरली. अचानक बस मागे येऊ लागते तेव्हा लोक जीव वाचवण्यासाठी पळत होते. मात्र यात बसने 13 जणांना चिरडले. Mumbai Best Bus Accident | या घटनेनंतर तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बस चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संतप्त जणावाकडून चालकाला ताब्यात घेण्यासाठी गर्दी करण्यात आली होती. पण त्याचवेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला अटक केली. पोलिसांनी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे. Mumbai Best Bus Accident | मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबाबात दु:ख व्यक्त केले. त्यांनी एक्सवर पोस्ट करत मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली. “मुंबईतील भांडूप रेल्वे स्थानकानजीक झालेल्या एका दुर्दैवी अपघातात ४ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत ९ जण जखमी झाले असून त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मृतांच्या वारसांना ५ लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल.” अशी पोस्ट देवेंद्र फडणवीस यांनी केली. हेही वाचा: Kothrud Politics: कोथरूड-वारजे भाजप बालेकिल्ल्यात खळबळ; ५ विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट