‘देव तारी त्याला कोण मारी’, १९ तासांनंतर चिमुकल्याची सुखरूप सुटका

महाड – ‘देव तारी त्याला कोण मारी’ या वाक्याची प्रचिती आज महाड दुर्घटनेदरम्यान आली आहे. रायगड जिल्ह्यातील महाड इमारत दुर्घटनेत एनडीआरएफकडून अद्यापही बचावकार्य सुरू आहे. या ढिगाऱ्याखालून १९ तासांनंतर चार वर्षाच्या मुलाला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1308220802850955/
नसीम मोहम्मद खान असे चार वर्षाच्या चिमुकल्याचे नाव आहे. त्याला सुखरूप बाहेर काढल्यानंतर सगळ्यांचाच चेहरा आनंदाने उजळून निघाला. टाळ्यांच्या कडकडाट झाला. शिवाय गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणाही देण्यात आल्या.
दरम्यान, महाड शहरातील काजळपुरा भागात असलेली तारकि गार्डन ही पाच मजली इमारत सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोसळली. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली सुमारे १८ ते १९ लोक अडकल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवविण्यात आला आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला आहे. महाड नगरपालिका आणि अन्य यंत्रणांनी ढिगारे उपसून जखमींना बाहेर काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.





