जोहान्सबर्ग – पृथ्वीवरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खंड असलेल्या आफ्रिका खंडाचे विभाजन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आफ्रिका खंडाच्या मधोमध असलेली पूर्व आफ्रिका परिसरातील 3500 किलोमीटर लांबीची भेग दिवसेदिवस जास्तच विस्तारत चालली असून येत्या काही वर्षांमध्ये आफ्रिका खंडाचे दोन तुकडे होतील अशी भीती आता भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
आफ्रिकेतील मोझांबिक या देशामध्ये लाल समुद्र परिसरामध्ये ही मोठी भेग असून ती दिवसेंदिवस विस्तारत चालली आहे. यापूर्वीच आफ्रिका खंडाचे दोन तुकडे होण्याची भविष्यवाणी व्यक्त केली गेली होती ती लवकरच खरे ठरेल अशी लक्षणे दिसू लागली आहेत. पृथ्वीच्या वरच्या स्तरांमध्ये ज्या टेक्नोटिक प्लेट्स असतात त्या पुढे मागे होत असतात प्रत्येक प्लेटचा पुढे मागे होण्याचा वेग विविध प्रकारचा असतो या प्लेट जेव्हा एकमेकांवर आदळत असतात तेव्हा विविध प्रकारच्या घटना घडत असतात. त्याचाच परिणाम म्हणून ह्या भेगेचा विस्तार वाढत चालला आहे.
भू वैज्ञानिकांनी खूप पूर्वी शोधलेली ही जी पूर्व आफ्रिकन भेग आहे. त्यामुळे आफ्रिका खंडाचे दोन भागांमध्ये स्वाभाविक विभाजन झाले आहे. ही भेग तीव्र झाली आणि मोठ्या प्रमाणात विस्तारली तर त्याचे काही कालावधीनंतर समुद्रात रूपांतर होईल आणि खंडाचे नैसर्गिकरित्या विभाजन होईल, असे चित्र शास्त्रज्ञांनी रंगवले आहे.
पूर्व आफ्रिकन भेग जसजशी विस्तारत जाईल तसतसे त्याच्यामध्ये समुद्राचे पाणी शिरू लागेल आणि हे भेग विस्तारण्याचे प्रमाण वाढत जाईल. या सर्व घडामोडींमुळे पृथ्वीवर आणखीन एका नव्या समुद्राची निर्मिती होईल, येत्या काही वर्षामध्ये जेव्हा ही भेग विस्तारण्याची आणि आफ्रिका खंडाचे विभाजन होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा जगाचा नकाशा बदलून जाणार आहे. आफ्रिकेतील अनेक छोट्या राष्ट्रांना याचा भौगोलिक दृष्ट्या फटका बसणार आहे.