नवी दिल्ली – जागतिक संकेताप्रमाणे दिल्ली सराफात बुधवारी सोन्याचा दर 53 रुपयांनी वाढून 46,844 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 45 रुपयांनी वाढून 63,333 रुपये प्रति किलो झाला.
अमेरिका आणि इंग्लंडचे पतधोरण लवकरच जाहीर होणार असल्यामुळे जागतिक धातू बाजारात संमिश्र वातावरण होते. पतधोरण जाहीर झाल्यानंतर चलन आणि धातू बाजार व शेअर बाजारांना दिशा मिळण्याची शक्यता एचडीएफसी सिक्युरिटीज या संस्थेचे विश्लेषक तपन पटेल यांनी व्यक्त केली.