शिरूरमध्ये 98 डिटोनेटर सापडल्यामुळे उडाली खळबळ

शिरूर -शिरूर बाह्यवळण रस्त्यावरील कचरा संकलन केंद्रावर कर्मचाऱ्यांना 98 डिटोनेटर सापडल्याने खळबळ उडाली आहे. शिरूर पोलिसांनी ते जप्त केले आहेत.

यासंदर्भात शिरूरचे पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांनी सांगितले की कचरा संकलन केंद्रावरील कर्मचारी घंटागाडी मधून आलेला कचरा वेगळा करत होते.

त्यावेळी डिटोनेटर सापडले; परंतु याबाबत माहिती नसल्याने त्याची चौकशी केल्यावर हे स्फोटक असल्याचे समजल्यावर शिरूर नगर परिषद स्वच्छता निरीक्षक दत्तात्रय बर्गे यांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली.

घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर आदीनी धाव घेतली. बॉम्बशोधक पथक व श्‍वानपथकाच्या साह्याने त्याची तपासणी करण्यात आली.

डिटोनेटरचा वापर विहीर खोदण्यासाठी व खाणीसाठी स्फोटकांच्या स्फोटासाठी केला जातो. दरम्यान, घटनास्थळी बॉम्बशोधक व श्‍वानपथकही दाखल झाले होते. या पथकात पोलीस नाईक कोंडके, कॉन्स्टेबल जाधव, फटांगडे आरवडे, वनवे, स्वान मॉन्टी यांचा समावेश होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.