भोर – भोर तालुक्यात आज 9 जणांचे करोना आहवाल पॉझिटिव्ह आले असून, यात आंबवडे खोऱ्यातील टिटेघर 4, वडगांव 3, करंदी व कारी प्रत्येकी 1 अशा 9 जणांचा समावेश आहे. भोर तालुक्यातील करोना बाधितांची संख्या आज अखेर 325 झाली असून, यातील 216 जणांनी करोनावर मात केली आहे, तर 101 जणांवर भोर, नसरापूर व पुणे येथे उपचार सुरू असल्याची माहिती भोर तालुका पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विशाल तनपुरे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी दिली. भोर शहरात आज एकही करोनाबाधित रुग्ण आढळला नाही. वेल्हे तालुक्यातील सोंडे येथे एकाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे गटविकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी सांगितले.