बेल्हे -बेल्हे (ता. जुन्नर) येथे महसूल खात्याच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने मध्यप्रदेश, बिहार व इतर राज्यांमधील परप्रांतीय नागरिकांना पाठविण्यासाठी तीन एसटी बसच्या माध्यमातून 84 जणांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचविण्यात आले आहे.
बेल्हा व परिसरात अनेक दिवसांपासून परप्रांतीय मजूर काम करीत होते; परंतु लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून हे मजूर येथेच अडकले होते. या सर्व मजुरांची आरोग्य तपासणी, कागदपत्रांची पूर्तता करून त्यांना पाठविण्यात आले.
मंडल अधिकारी राजश्री आढाव, तलाठी विजय साळवे, तलाठी संजय सैद, दिलीप पवार, पोलीस पाटील बाळकृष्ण शिरतर, बबन औटी, विलास गफले, नाना भुजबळ, किसन देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण जाधव, हरिदास शिरतर, गोरक्ष वाघ, संतोष भंडारी, पोलीस कॉन्स्टेबल एस. एस. फड, एम. टी. काठमोरे, शिंदे उपस्थित होते. आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांच्या निरीक्षणाखाली एसटी रवाना करण्यात आली.