८ वर्षांचं नातं, वयात १३ वर्षांचे अंतर; सेलिब्रिटी स्टार कपलचे ब्रेकअप

Dakota Johnson And Chris Martin Breakup | प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री डकोटा जॉन्सन आणि ख्रिस मार्टिन यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले आहे. आठ वर्ष एकत्र राहिल्यानंतर दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र दोन्ही स्टार्स किंवा त्यांच्या टीमकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
वयातील अंतर ठरलं ब्रेकअपचं कारण
वयातील अंतर व मुलं हे त्यांच्या ब्रेकअपचे कारण असल्याचे म्हंटले जात आहे. डकोटा ३५ वर्षांची, तर ख्रिस ४८ वर्षांचा आहे. डकोटाला आई व्हायचं होतं, पण ख्रिसला पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. त्यामुळे त्याला मुलं नको होती. ती त्याच्यावर आणि त्याच्या मुलांवर खूप प्रेम करते आणि तोही तिच्यावर खूप प्रेम करतो, परंतु काही गोष्टींमध्ये त्यांचं एकमत होत नसल्याने दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
दोघांनी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु वयातील अंतर ही मोठी समस्या होती. एवढी वर्षे नात्यात राहिल्यानंतर आयुष्यात पुढे जाणं दोघांसाठीही कठीण आहे, पण दुसरा पर्याय नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. Dakota Johnson And Chris Martin Breakup |
डकोटा आणि ख्रिस 2017 पासून एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर अनेकदा ते एकत्र कार्यक्रमांना हजेरी लावत असे. 2019 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं, पण दोन महिन्यांनी परत ते एकत्र आले. त्यानंतर त्यांच्या लग्नाच्या बातम्याही आल्या होत्या. पण दोघांच्याही टीमने हे वृत्त फेटाळले. कोल्डप्लेचा यावर्षी जानेवारीमध्ये भारतात कॉन्सर्ट झाला होता, तेव्हा डकोटा ख्रिसबरोबर भारतात आली होती. Dakota Johnson And Chris Martin Breakup |
हेही वाचा:





