श्रीनगर – पुलवामा येथे सीआरपीएफच्या वाहनाच्या ताफ्यावर जो दहशतवादी हल्ला झाला होता, त्या प्रकरणात 19 दहशतवाद्यांचा हात होता. त्यापैकी आठ दहशतवादी ठार झाले असून सात जणांना अटक करण्यात आली आहे. अन्य चार आरोपींमध्ये तीन पाकिस्तानी आहेत ते मात्र अजून जीवंत आहेत अशी माहिती काश्मीर रेंजचे अतिरीक्त पोलिस महासंचालक विजयकुमार यांनी आज दिली. आज या हल्ल्याच्या घटनेचा चौथा स्मृती दिन होता. त्या संबंधात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेचा या हल्ल्यात हात होता. आमच्या दलांच्या जवानांनी या संघटनेच्या पाठीराख्यांचा सर्वत्र कसून शोध घेत त्यातील महत्वाच्या आरोपींना यमसदनी धाडण्यात आले आहे. आज काश्मीर खोऱ्यात जैश ए महंमदचे 7 ते 8 स्थानिक आणि 5 ते 6 पाकिस्तानी दहशतवादी कार्यरत आहेत. त्यांनाही आम्ही लवकरच नेस्तानबुत करू असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे. https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/rajasthan-will-send-copy-of-our-budget-to-modi-ashok-gehlot/ आम्ही केवळ या दहशवाद्यांची मॉड्युलच उद्धवस्त करीत नाही तर त्यांना आर्थिक पाठबळ देणाऱ्यांचीही पाळेमुळे खणून काढत आहोत. याच टेरर फंडींगसाठी वापरण्यात येणारे 41 लाख रूपयेही आम्ही पकडले आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.