Sharjah Masters chess tournament 2024 : सहाव्या फेरीनंतरही भारताच्या अरविंद चिदंबरमची आघाडी कायम…

Sharjah Masters Chess Tournament 2024 : शारजा मास्टर्स स्पर्धेत सहाव्या फेरीनंतर भारतीय ग्रँड मास्टर अरविंद चिदंबरम एकमेव आघाडीवर आहे. त्याने अमेरिकेच्या सॅम शँकलँडसोबत ड्रॉ खेळला. अरविंदचे सहा फेऱ्यांतून पाच गुण आहेत आणि 2700 ईएलओ (ELO) गुणांच्या एलिट क्लबमध्ये सामील होण्यासाठी तो फक्त दोन गुणांनी मागे आहे.
सहाव्या फेरीचे वैशिष्ट्य म्हणजे अव्वल मानांकित आणि भारतीय ग्रँड मास्टर अर्जुन इरिगेसी. काळ्या मोहऱ्यांसह खेळत त्याने रशियाच्या डॅनिल यूफाला 42 चालींमध्ये पराभूत केले. तो 4.5 गुणांसह अनेक खेळाडूंमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. स्पर्धेत अजून तीन फेऱ्या खेळायच्या आहेत.
अरविंदने सहाव्या फेरीत अमेरिकेच्या सॅम शँकलँडविरुद्ध सहज बरोबरी साधून एकेरीची आघाडी कायम राखण्यात यश मिळविले. जगातील बलाढ्य खुल्या स्पर्धांमध्ये समाविष्ट असलेल्या या स्पर्धेत अव्वल मानांकित अर्जुन एरिगेने रशियाच्या डॅनिल युफावर शानदार विजयाची नोंद केली. इराणचे बर्दिया डेन्शॉवर आणि अमीन तबताबेई, अमेरिकेचे हॅन्स मोके नीमन आणि शँकलँड, सर्बियाच्या ॲलेक्सी सरानासोबत अर्जुन इरिगेसी साडेचार गुणांसह संयुक्त दुसऱ्या स्थानावर आहेत.
Sharjah Masters chess tournament 2024 : भारतीय ग्रँडमास्टर अरविंद चिदंबरमनं स्पर्धेत घेतली आघाडी…
इंग्लंडच्या श्रेयस रॉयलने अभिमन्यू पुराणिकला बरोबरीत रोखून ग्रँड मास्टर नॉर्मकडे आणखी एक पाऊल टाकले. काळ्या मोहऱ्यांसह खेळताना चिदंबरम याला शँकलँडविरुद्ध फारसे आव्हान मिळाले नाही आणि त्याने अमेरिकन खेळाडूला खेळ बरोबरीत सोडवण्यास भाग पाडले. अर्जुनने काळ्या मोहऱ्यांसह खेळताना युफाविरुद्ध दिवसातील सर्वात मोठा विजयही नोंदवला. त्याने रशियन खेळाडूला 42 चालीनंतर पराभव स्वीकारण्यास भाग पाडले.


