7th Pay Commission: खूशखबर ! ‘या’ कर्मचाऱ्यांच्या खात्यात चार महिन्यांची थकबाकी होणार जमा, जाणून घ्या किती वाढणार DA?

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. नोव्हेंबर महिन्यात सरकार या कर्मचाऱ्यांना मोठी भेट देऊ शकते. नोव्हेंबर महिन्याच्या पेन्शनसोबतच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांची थकबाकी पेन्शन आणि वाढीव महागाई भत्त्याचा सुद्धा लाभ मिळणार आहे.
31 टक्के झाला महागाई भत्ता
केंद्र सरकारने १ जुलैपासून डीए आणि डीआरमध्ये वाढ केली आहे. सरकारने यात 31 टक्के वाढ केली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरच्या पेन्शनसह जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पैसे मिळू शकतात. मात्र आत्तापर्यंत याची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही, परंतु लवकरच त्याची अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
जाणून घ्या किती वाढणार पगार ?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, DR ची गणना कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारावर केली जाते. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे पेन्शन 20,000 रुपये असेल तर त्याचा पगार दरमहा सुमारे 600 रुपयांनी वाढेल.
किती मिळेल थकबाकी?
७व्या वेतन आयोगाअंतर्गत मिळणाऱ्या थकबाकीबाबत बोलायचे झाले तर सर्व कर्मचाऱ्यांची रक्कम त्यांच्या श्रेणीनुसार असेल. समजा एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 31 हजार 550 रुपये असेल तर त्याला 28 टक्के डीआयआरनुसार 8 हजार 834 रुपये मिळत होते. मात्र सरकारने डीएमध्ये 3 टक्के वाढ केली, तर 31 टक्क्यांनुसार त्यांच्या पगारात महिन्याला 9 हजार 781 रुपयांची वाढ होणार आहे.
किती मिळेल पेन्शन?
ग्रेडपेच्या आधारे हिशोब बघितला तर दरमहा DR 947 रुपयांनी वाढेल. म्हणजे चार महिन्यांची थकबाकी 3 हजार 788 रुपये असेल. जर नोव्हेंबरचा वाढीव डीआर देखील समाविष्ट केला तर पेन्शनधारकांना 4 हजार 375 रुपये मिळतील.





