लक्ष्मीनगरात ७८ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

आळंदी, – चऱ्होली खूर्द (ता. खेड) येथील लक्ष्मीनगर येथे देशाचा ७८ वा स्वातंत्र्य दिन आनंदोत्सव मोठ्या दिमाखदार वातावरणात संपन्न झाला. येथील अंगणवाडीत ध्वजाचे ध्वजारोहण ज्ञानेश्वर पगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्या अर्चना थोरवे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी राष्ट्रगीत, ध्वजगीताने ध्वजास मानवंदना दिली.
यावेळी माजी सरपंच काळुराम थोरवे, सिद्धेश्वर पगडे, राहुल थोरवे, अर्जुन थोरवे, अंगणवाडी सेविका मंदाकिनी कुंभार, माजी सैनिक दुर्गादास इंगळे, शिवाजी धुळगंड, भाऊसाहेब माळशिखरे, ज्ञानेश्वर म. बोरुडे, उभे महाराज, फड महाराज, दादासाहेब पांचाळ, किरण मोटकर, श्रीराम पवळ, बाळासाहेब कदम, बिभीषण पवळ, बाळासाहेब कदम, हबीब अन्सारी, रफिक शेख, मनोहर चक्रनारायण, राजू साळुंके, मुक्ताराम दहिफळे, बाळू फड, विठ्ठल घरजाळे, उत्तम गडदे, अंकुश भगत, अभिषेक ढेंगळे, जयश्री पवळ, अलका पवळ, पूजा थोरवे, जयश्री शेळके, कालिंदा बोरुडे, सुप्रिया कोटकर यांसह बालक विद्यार्थी, पालक, परिसरातील नागरिक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामविकास अधिकारी जगन्नाथ जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. अर्चना थोरवे, हबीब पठाण, मनोहर चक्रनारायण, मनसुख लोढा, भाऊसाहेब माळशिखरे, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक विलास मराळ, यांचे तर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. अनन्या अर्जुन थोरवे, शुभांगी सानप, रुपाली उरुणकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब पांचाळ यांनी केले.






