Pimpri : नोव्हेंबर अखेरपर्यंत 783 औद्योगिक ग्राहकांच्या नवीन वीजजोडण्या

पिंपरी : गणेशखिंड मंडल अंतर्गत गेल्या एप्रिल ते नोव्हेंबर 2024 या आठ महिन्यांच्या कालावधीत 65 उच्चदाबाच्या नवीन वीजजोडण्यांसह 57 हजार 640 घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.
यात तब्बल 783 औद्योगिक ग्राहकांच्या नवीन वीजजोडण्यांचा समावेश आहे, अशी माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे.
नवीन वीजजोडणीचा खर्च महावितरणकडून करण्यात येत असेल (एनएससी योजना) व या वीजजोडणीसाठी नवीन ट्रॉन्सफॉर्मर बसविण्याची आवश्यकता असेल तर त्यासाठी आवश्यक असणार्या योग्य जागेचे नोंदणीकृत भाडे करारपत्र (रजिस्टर्ड लीज डिड) संबंधित ग्राहकाने नियमानुसार महावितरणसोबत करणे आवश्यक आहे.
महावितरणला रजिस्टर्ड लीज डिडद्वारे प्राप्त झालेल्या अधिकृत व कायदेशीर जागेवरच स्वखर्चाने नवीन ट्रॉन्सफॉर्मर व वीजयंत्रणा उभारण्याचे काम करता येते. त्यामुळे अतिशय आवश्यक असलेल्या रजिस्टर्ड भाडे करारपत्राच्या नियमाची पूर्तता होत नसल्याने महावितरणकडून स्वखर्चाने एनएससी योजना राबविता येत नाही.





