पुणे | कौशल्य व उद्योजकता विकासासाठी ७५ कोटींचा निधी मंजूर
Updated On:

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या प्रमोद महाजन कौशल्य विकास व उद्योजकता अभियानांतर्गत ७५ कोटी रुपयांचा निधी वितरीत व खर्च करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.
सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये २५० कोटी रुपये इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीने अर्थसंकल्पित निधीपैकी पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील १५० कोटी रु. इतका निधी वितरीत व खर्च करण्यास मान्यता देण्याची विनंती केली होती. त्यातील निम्मा निधी वितरीत व खर्च करण्यास मंजूरी मिळालेली आहे.
राज्य शासनाने वितरीत केलेला निधी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त यांनी कोषागारामधून आहरीत करून महराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना खर्चासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.




