Pimpri News | कर्जत विधानसभा मतदारसंघात ७५.३० टक्के मतदान
Updated On:

कर्जत/खालापूर, – १८९ कर्जत विधानसभा मतदारसंघात पुरुष १ लाख ५९ हजार २९३ मतदार, महिला १ लाख ५९ हजार ४४६ मतदार आणि इतर ३ असे एकूण ३ लाख १८ हजार ७४२ मतदार होते.
पैकी पुरुष १ लाख २२ हजार ७४० मतदार, महिला १ लाख १७ हजार २६९ मतदार आणि इतर १ अशा एकूण २ लाख ४० हजार १० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजाविला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार कर्जत – खालापूर विधानसभा मतदारसंघात बुधवारी (दि.२०) एकूण ७५.३० टक्के मतदान झाले आहे.
मतदारसंघातील ३६२ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. यासह मतदारसंघातील नऊ उमेदवारांचे भवितव्य इव्हीएममध्ये बंद झाले आहे.





