72nd National Film Awards : 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा! ‘हा’ ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट
भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचे मानले जाणारे 72 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (72nd National Film Awards) जाहीर करण्यात आले आहेत.

72nd National Film Awards : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठेचे मानले जाणारे 72 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (72nd National Film Awards) जाहीर करण्यात आले आहेत. 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या विविध भारतीय भाषांतील उत्कृष्ट चित्रपट, कलाकार आणि तंत्रज्ञांचा यंदा गौरव करण्यात आला.
दिग्दर्शक जयराज यांच्या अध्यक्षतेखालील 11 सदस्यीय परीक्षक मंडळाने विजेत्यांची निवड (72nd National Film Awards) केली असून यंदाच्या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी यंदाचे राष्ट्रीय पुरस्कार विशेष ठरले. ‘मुक्काम पोस्ट बोम्बीलवाडी’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
तसेच ‘हमसफर’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा, तर ‘भंगार’ या मराठी-इंग्रजी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. या पुरस्कारांमुळे मराठी चित्रपटसृष्टीच्या गुणवत्तेची पुन्हा एकदा देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे.
हिंदी विभागात (72nd National Film Awards) श्रीकांत या चित्रपटाने बाजी मारत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा मान पटकावला. अभिनेत्री यामी गौतमला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर कार्तिक आर्यन आणि ममूटी यांना संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, तर दिग्दर्शक आनंद एल. राय यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले.
प्रादेशिक चित्रपटांच्या विभागातही विविध भाषांतील चित्रपटांनी आपली छाप पाडली. यंदाच्या पुरस्कारांमध्ये अरविंद स्वामी आणि कार्ती यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या मेय्याझगन या चित्रपटाला विशेष उल्लेख पुरस्कार जाहीर झाला. तसेच धनुष अभिनित कॅप्टन मिलर या चित्रपटालाही स्पेशल मेंशन पुरस्कार देण्यात आला आहे.
पुरस्कार विजेत्यांची यादी
सर्वोत्कृष्ट चित्रपट ( Best Feature Film ) : Article 370
सर्वोत्कृष्ट अभिनेता : कार्तिक आर्यन ( चंदू चॅम्पियन ), मामूटी ( ब्रह्मयुगम )
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : यामी गौतम ( आर्टिकल ३७० )
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : राजकुमार पेरियासामी ( अमरन )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : रोपश्री वरकाडी ( मिथ्या ) आणि सचन नमिदास ( महाराजा )
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: संजय मिश्रा ( भक्षक )
सर्वोत्कृष्ट चित्रपट Providing Wholesome Entertainment : Kalki 2898 AD
राष्ट्रीय आणि सामाजिक मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट : कॅप्टन मिलर
सर्वोत्कृष्ट बालकलाकार : रिद्धिमान बॅनर्जी, तपोमय देब आणि गीताश्री चक्रवर्ती
सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी : ब्रह्मयुगम (शेहनाद जलाल)
सर्वोत्कृष्ट पटकथा: पुष्पा २ (सुकुमार)
सर्वोत्कृष्ट संवाद लेखक: लकी भास्कर ( संवाद लेखक : वेंकी अटलुरी)
सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन: Kalki 2898 AD
Best Action Direction : अनल अरासू, महाराजा
सर्वोत्कृष्ट मेकअप आर्टिस्ट: कमिटी कुर्रोलू
सर्वोत्कृष्ट वेशभूषा : पुष्पा २- दीपाली नूर आणि शीतल शर्मा
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: आर्टिकल ३७०, शाश्वत सचदेव
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत: जी.व्ही.प्रकाश, अमरन
सर्वोत्कृष्ट गीत: मनोज मुंतशीर, मैदान
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक: अभय जोधपूरकर, घरत गणपती ( नवसाची गौराई माझी )
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका: वैकोम विजयालक्ष्मी
सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन: विजय गांगुली, स्त्री 2
सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन : मानस चौधरी, भूल भुलैया ३
सर्वोत्कृष्ट संपादन ( Editing ): आर कलैवन्नन, अमरन
सर्वोत्कृष्ट प्रादेशिक सिनेमे
सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपट: जुईफूल
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट: चलचित्र एकोन
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट: श्रीकांत
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – मिथ्या
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट: Feminichi Fathima
सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट: मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी
सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपट: लहरी
सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट: रायन
सर्वोत्कृष्ट गढवाली चित्रपट: ढोली
सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपट: कमिटी कुर्रोलू
सर्वोत्कृष्ट गुजराती चित्रपट – मारन
सर्वोत्कृष्ट मणिपुरी चित्रपट – सुनीता
विशेष उल्लेख – ‘कॅप्टन मिलर’साठी धनुष आणि ‘मियाझगन’साठी सुरेन जी






