Vivo S60: ७,२००mAh बॅटरी, १००x झूम; व्हिवो एस६० सीरिजने मिडरेंज बाजारात केली दमदार एंट्री!
Vivo S60 या फोनचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे ७,२००mAh क्षमतेची बॅटरी. ही बॅटरी ९० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे कमी वेळेत फोन चार्ज होतो. फोन अँड्रॉइड १६ आधारित ओरिजिन ६ प्रणालीवर चालतो. तसेच ३डी अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आणि आयपी६९ रेटिंगची सुविधाही देण्यात आली आहे.

Vivo S60: स्मार्टफोन निर्माता व्हिवो ने चीनमध्ये आपली नवीन व्हिवो एस६० सीरिज सादर केली आहे. या सीरिजमध्ये व्हिवो एस६० आणि व्हिवो एस६० व्हायटॅलिटी एडिशन हे दोन स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले आहेत. मोठी बॅटरी, दमदार कॅमेरा, जलद चार्जिंग आणि आकर्षक डिस्प्ले यामुळे हे दोन्ही फोन सध्या चर्चेत आहेत.
व्हिवो एस६० मध्ये ६.५९ इंचाचा १.५के एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. १४४ हर्ट्झ रिफ्रेश रेटमुळे गेमिंग आणि स्क्रोलिंगचा अनुभव अधिक स्मूथ मिळतो. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८एस जनरेशन ३ प्रोसेसर असल्याने मल्टिटास्किंग आणि हेवी गेमिंग सहज करता येते. (Vivo S60)
फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात ५० मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा, ८ मेगापिक्सेल अल्ट्रावाईड कॅमेरा आणि ५० मेगापिक्सेल पेरिस्कोप टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. विशेष म्हणजे हा फोन १००x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी ५० मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
या फोनचे आणखी एक मोठे आकर्षण म्हणजे ७,२००mAh क्षमतेची बॅटरी. ही बॅटरी ९० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे कमी वेळेत फोन चार्ज होतो. फोन अँड्रॉइड १६ आधारित ओरिजिन ६ प्रणालीवर चालतो. तसेच ३डी अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आणि आयपी६९ रेटिंगची सुविधाही देण्यात आली आहे.

Vivo S60
दुसरीकडे, व्हिवो एस६० व्हायटॅलिटी एडिशन मध्ये डिस्प्ले, बॅटरी आणि चार्जिंगची वैशिष्ट्ये जवळपास सारखीच आहेत. मात्र, या मॉडेलमध्ये स्नॅपड्रॅगनऐवजी मीडियाटेक डायमेन्सिटी ७५०० प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच यात पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स नसून मुख्य आणि अल्ट्रावाईड कॅमेरे कायम ठेवण्यात आले आहेत. (Vivo S60)
किंमतीबाबत बोलायचे झाल्यास, व्हिवो एस६० ची सुरुवातीची किंमत सुमारे ५० हजार रुपये आहे. तर टॉप व्हेरियंटची किंमत सुमारे ६२ हजार रुपयांपर्यंत जाते. व्हिवो एस६० व्हायटॅलिटी एडिशनची सुरुवातीची किंमत सुमारे ४१ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. (Vivo S60)
हे दोन्ही स्मार्टफोन ३ जूनपासून चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. अर्ली समर ग्रीन, मिडसमर नाइट्स ड्रीम आणि सी ऑफ स्टार्स अशा आकर्षक रंगांमध्ये ते उपलब्ध असतील. भारतात या फोनचे लॉन्चिंग कधी होणार याबाबत कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.





