पुणे जिल्हा | बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे ‘आरोग्यवारी’त ७०० स्पर्धकांचा सहभाग

बारामती, (प्रतिनिधी) – बारामती येथील बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे ‘आरोग्यवारी – पुणे ते बारामती १०० किमी ग्रुप रिले रन’ चे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे आरोग्यवारीचे ‘५ वे’ वर्ष होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आरोग्यदायी शुभेच्छा देण्यासोबतच, नागरिकांमध्ये आरोग्य आणि व्यायामविषयक जागृती वाढवणे यासाठी बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक आयर्नमॅन सतिश ननवरे यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या ग्रुप रिले रनमध्ये विविध वयोगटातील नागरिकांचा समावेश होता. १० किमी , २१ किमी, ५० किमी आणि १०० किमी अशा रनिंग कॅटेगरीज समावेश होता. यंदाच्या पर्वामध्ये एकूण ७०० स्पर्धकांनी सहभाग घेतला.
आरोग्यवारीची सुरुवात सारसबाग गणपती येथून श्री गणेशाच्या आरतीने पहाटे ४:०० वाजता करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर,गिरिश कोंढरे (कल्याण भेळ), प्रकाश कुतवळ (उर्जा उद्योग समूह),
केदारी (विश्वस्थ,श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट), अक्षय गोडसे,विश्वस्थ (उत्सव प्रमुख,श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट), राजू भिलारे या मान्यवरांच्या हस्ते रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. सारसबाग येथील सर्व व्यवस्था दीपक मानकर यांच्याद्वारे करण्यात आली.
१० किमी पूर्ण झालेल्या रनर्सला हडपसर, गाडीतळ येथे प्रमाणपत्र आणि मेडल्स देऊन गौरविण्यात आले. दिवेघाट माथा येथे उद्योजक तथा अल्ट्रामॅन, बारामतीचे सुपुत्र दशरथ जाधव यांच्यातर्फे रनर्सच्या स्वागत आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.
सासवड नगरपरिषद येथे उद्योजक संदीप राऊत यांच्यातर्फे रनर्सचे स्वागत करण्यात आले. हॉटेल मल्हार ग्रँड, जेजुरी येथे उद्योजक जयदीपभैय्या बारभाई यांच्यामार्फत रनर्सचे स्वागत करण्यात आले. कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, काऱ्हाटी येथे रनर्सच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
उद्योजक सुभाष सोमाणी आणि प्रफुल्ल तावरे यांच्यातर्फे आरोग्यवारीचे स्वागत आणि अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. कऱ्हावागज येथे उद्योजक सुरेश परकाळे यांच्यातर्फे आरोग्यवारीचे स्वागत करण्यात आले. बारामतीच्या वेशीवर नेवसेवस्ती येथे उद्योजक कुणाल नेवसे यांच्यातर्फे अल्पोपहार देण्यात आला.
कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे व युवानेते जय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. १०० किमी अंतर पूर्ण केलेल्या रनर्सला मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी मंत्री संजय बनसोडे म्हणाले की,ही आरोग्यवारी एक लोकचळवळ म्हणून नावारूपाला यावी आणि अखंडपणे ही लोकचळवळ पुढे चालावी अशी आम्हा सर्वांची इच्छा आहे.”
आरोग्यवारी यशस्वी करण्यासाठी पुणे रा.काँ.शहराध्यक्ष दीपक मानकर, प्रकाश कुतवळ, गिरीश मांढरे, पुणे पोलीस विभाग, उद्योजक दशरथ जाधव, संदीप राऊत, जयदीप बारभाई, सुभाष सोमाणी, प्रफुल्ल तावरे, सुरेश परकाळे, कुणाल नेवसे, सचिन सातव (महालक्ष्मी उद्योग समूह), विजुभाऊ गालिंदे, जय जवान मंडळ, सचिन शाहीर (संजीवनी ग्रुप), ज्योतीचंद भाईचंद सराफ,
नटराज नाट्य कला मंडळ किरणदादा गुजर, विद्याधर काटे, वैभव काटे (काटे मोटर्स), सुरेश परकाळे (स्वराज फर्निचर), बबलू खटावकर, ज्ञानेश्वर जगताप, राहुल जगताप, बाळू कारंडे, लक्ष्मण भोसले, बिरजू मांढरे, मेडिकल सपोर्ट आय स्पोर्ट्स / सुश्रुत हॉस्पिटल डॉ. सुमेध मगर, निलेश कुलकर्णी, डॉ. हेमंत मगर, प्रशांत (नाना) सातव कारभारी अण्णा चॅरिटेबल यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर जगताप यांनी केले.





