रफाह – गाझा सिटीमध्ये मदतीच्या प्रतिक्षेत असलेल्या पॅलेस्टिनींवर इस्रायलने केलेल्या मार्यामध्ये किमान ७० पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले. आज झालेल्या हल्ल्यामध्ये किमान २८० जण जखमी झाले आहेत, असे गाझा पट्ट्यातील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.
इस्रायलच्या हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या पॅलेस्टिनींची संख्या आता ३० हजारांच्यापुढे गेली आहे. तर ७० हजारांच्यापुढे जखमी झाले आहेत. युद्धाला प्रारंभ झाल्यापासून इस्रायलच्या मार्याचे प्रमुख लक्ष्य गाझा सिटी आणि गाझा पट्ट्यातील उत्तरेकडील भाग होता.
इस्रायलच्या मार्याच या भागाचे मोटे नुकसान झाले आहे णि तेथील नागरिकांना मोठ्या संख्येने दक्षिणेकडे विस्थापित व्हावे लागले आहे. इस्रायलच्या हल्ल्यांमुळे या भागात मदत पोचवणे जवळपास असक्य झाले आहे, असे मदत पुरवणार्या एजन्सींचे मत आहे.
हमास आणि इस्रायल दरम्यानच्या युद्धविरामाची चर्चा अजूनही सुरू असून या संभाव्य युद्धविरामादरम्यान हमासच्या ताब्यातील किमान १३० इस्रायली नागरिकांच्या सुटकेवर भर दिला जाणे अपेक्षित आहे.