सातारा -जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 69 नागरिकांनी दहा दिवसांच्या उपचारांनंतर करोनावर मात केल्याने त्यांना मंगळवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमधून करोनामुक्त झालेल्या 13 रुग्णांचा समावेश आहे.
जावळी तालुक्यातील पुनवडी येथील 34, 55, 48, 55, 47, 42, 47, 40, 61, 47, 62 वर्षीय पुरुष, कुसुंबी येथील 30 वर्षीय महिला, पुनवडी येथील एक पुरुष, खंडाळा तालुक्यातील शिरवळमधील 42, 65, 35 वर्षीय महिला, 7 वर्षांची बालिका, 29, 25 व 20 वर्षीय युवक, शिर्के कॉलनीतील 28 वर्षीय युवक, नक्षत्र सिटी, पळशी रोड येथील 40 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी फाटा येथील 25 वर्षीय युवक.
माण तालुक्यातील राजवाडी येथील 31 वर्षीय युवक, कराड तालुक्यातील सह्यादी हॉस्पिटलमधील 65 वर्षीय पुरुष व 47 वर्षीय महिला, सुपने येथील 28 वर्षीय युवक, तारुख येथील 48 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 30, 48, 21 वर्षीय पुरुष व 75 वर्षीय महिला
हिंगनोळे येथील 85 वर्षीय महिला, शामगाव येथील 53 वर्षीय पुरुष, ओगलेवाडी येथील 35 वर्षीय महिला, वाई तालुक्यातील परखंदी येथील 49, 38,वर्षीय पुरुष, 8 वर्षीय बालक व 38 वर्षीय महिला, नावेचीवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, धर्मपुरीतील 34 वर्षीय महिला, सातारा तालुक्यातील भरतगाव येथील 48 वर्षीय पुरुष, जिहे येथील 70, 50, 34 व 46 वर्षीय महिला, 16 वर्षीय मुलगी, 45 वर्षीय पुरुष व 10 वर्षांचे बालक, करंडी येथील 35 वर्षीय युवक, गोकुळनगरमधील 15 वर्षांची बालिका, पाटण तालुक्यातील कामरगाव येथील 40 वर्षीय पुरुष.
कोयनानगरमधील 48, 60 वर्षीय पुरुष, कडवे बुद्रुक येथील 35 वर्षीय युवक, सडा दाढोली येथील 85 वर्षीय महिला, साईकडे येथील 24 वर्षीय महिला, कोयनानगर येथील 52 वर्षीय पुरुष. खटाव तालुक्यातील निमसोड येथील 47 वर्षीय पुरुष, विठ्ठलवाडीतील 70 वर्षीय महिला, फलटण तालुक्यातील फरांदवाडी येथील 69 वर्षीय पुरुष, 5 वर्षांचे बालक व दोन महिन्यांचे बाळ.
सरडेतील 55, 20 वर्षीय महिला, सासवड येथील 30 वर्षीय युवक, हिंगणगाव येथील 32 वर्षीय युवक, रविवार पेठेतील 39 वर्षीय महिला, विंचुर्णी येथील 43 वर्षीय पुरुष, या करोनामुक्त रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. कराडच्या कृष्णा रुग्णालयातील करोनामुक्त रुग्णांना शुभेच्छा देण्यासाठी वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. संजय पाटील, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. नम्रता कदम, योगेश कुलकर्णी व कर्मचारी उपस्थित होते.