सातारा -जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 68 जणांना दहा दिवसांनतर बुधवारी घरी सोडण्यात आले. तर 834 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये खंडाळा तालुक्यातील पळशी येथील 55 वर्षीय महिला., जावळी तालुक्यातील दापवडी येथील 36 वर्षीय पुरुष, पुनवडी येथील 33, 75, 75, 54, 28,50 वर्षीय महिला, 19 वर्षीय तरुणी व 11, 13, 3 वर्षीय बालिका व 76, 56 वर्षीय पुरुष., सातारा तालुक्यातील सातारा येथील 31 वर्षीय पुरुष, तामजाईनगर येथील 30 वर्षीय पुरुष, विमल सिटीतील 65,25, 47 वर्षीय महिला, खावली येथील 30 वर्षीय पुरुष, कर्मवीरनगर खिंडवाडी येथील 37 वर्षीय महिला व 75 वर्षीय पुरुष.,
वाई तालुक्यातील शेंदुरजणे येथील 30, 28 वर्षीय महिला 65, 48 वर्षीय पुरुष, 4 वर्षीय बालिका, 13, 12 वर्षीय बालक, सायगांव येथील 64 वर्षीय महिला, बोपेगाव येथील 35 वर्षीय पुरुष., खटाव तालुक्यातील खटाव येथील 50 वर्षीय महिला, डिस्कळ येथील 58, 59 वर्षीय महिला.,
कराड तालुक्यातील सैदापूर येथील 50 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय महिला, मलकापूर येथील 40, 43 वर्षीय पुरुष, मिरगाव येथील 35 वर्षीय पुरुष, वराडे येथील 45 वर्षीय महिला, वनवासमाची येथील 60 वर्षीय पुरुष, चिखलेवाडी येथील 17 वर्षीय युवक., पाटण तालुक्यातील
पाटण येथील 53 वर्षीय पुरुष, कसणी येथील 53 वर्षीय पुरुष., महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील 2 वर्षाची बालिका, 22, 25, 46, 20 व 50 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष., फलटण येथील लक्ष्मीनगर येथील 42, 49, 45 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला व 19 वर्षीय तरुणी,
वारेवस्ती खामगांव येथील 62, 24, 52, 25, 22, 70, 26 वर्षीय पुरुष व 55, 45, 20 वर्षीय महिला, साखरवाडी येथील 50 वर्षीय महिला., माण तालुक्यातील दहिवडी येथील 65 वर्षीय पुरुष.