Pune District : लोकअदालतीत 671 प्रकरणे निकाली; राजगुरूनगर येथे विविध प्रकरणांमध्ये दोन कोटींची वसुली
Pune District : या कार्यक्रमास न्यायाधीश बी. एस. वावरे, सरिता विशंभरण, एस. बी. नाईकनवरे, जे. सी. गुप्ता, एस. व्ही. उतकर, तसेच खेड वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. रोहिदास टाकळकर, अॅड. रोडे आणि इतर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजगुरुनगर : जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय, राजगुरुनगर (ता. खेड) येथे आयोजित राष्ट्रीय लोकअदालतात एकूण 7365 प्रकरणांपैकी 671 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली असून 1 कोटी 98 लाख 92 हजार 625 रुपयांची वसुली करण्यात आली.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे आणि तालुका विधी सेवा समिती, खेड यांच्या संयुक्त विद्यमाने या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन तालुका विधी सेवा समिती खेडचे अध्यक्ष तथा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्या हस्ते संविधान पूजन करून करण्यात आले. या लोकअदालतात दिवाणी व फौजदारी प्रकरणे, दाखलपूर्व बँक वसुली, ग्रामपंचायत, महावितरण तसेच फायनान्स संस्थांची प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. पाच पॅनलच्या माध्यमातून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या कार्यक्रमास न्यायाधीश बी. एस. वावरे, सरिता विशंभरण, एस. बी. नाईकनवरे, जे. सी. गुप्ता, एस. व्ही. उतकर, तसेच खेड वकील बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. रोहिदास टाकळकर, अॅड. रोडे आणि इतर वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सरसेनापती हंबीरराव मोहिते लॉ कॉलेज, राजगुरुनगर, कै. निर्मलाताई पिंगळे लॉ कॉलेज, चाकण येथील शिक्षक-विद्यार्थी, न्यायालयीन कर्मचारी, पोलिस अधिकारी, बँका, ग्रामपंचायत व महावितरणचे अधिकारी यांनीही या लोकअदालतीच्या यशस्वी आयोजनासाठी सहभाग नोंदवला.
न्याय आपल्या दारी या संकल्पनेनुसार विधी सेवा प्राधिकरण विविध उपक्रमांतून नागरिकांपर्यंत पोहोचत आहे. लोकअदालतीच्या माध्यमातून तडजोडीने वाद मिटवून वेळ व खर्चाची बचत करावी.
–ए. एस. सय्यद, मुख्य न्यायाधीश, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयदाखलपूर्व दावे
एकूण प्रकरणे… तडजोड… वसुली
2,623… 460…1,19,23,317 रुपये
यामध्ये पाणीपट्टी वसुलीच्या प्रकरणांचा मोठा वाटा असून 455 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
न्यायालयीन दावे
एकूण प्रकरणे… तडजोड… वसुली
4,747… 211… 79,69,308 रुपये
यामध्ये मोटार अपघात, धनादेश कलम 138, इतर दिवाणी खटले आदी प्रकरणांचा समावेश होता.
हेही वाचा : Gas Shortage: सिलिंडरसाठी रांगा लागल्या नाहीत, ऑनलाइन बुकिंगद्वारेच पुरवठा; जिल्हाधिकारी डुडी यांची माहिती





