रेखा गुप्ता यांच्यासह 6 आमदारांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ; कोणाला मिळाली संधी? जाणून घ्या…

Delhi CM Oath Ceremony | दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची रेखा गुप्ता यांनी आज शपथ घेतली. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहे. उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पक्षासाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे, कारण 27 वर्षानंतर भाजप राजधानीत सत्तेत परत आला आहे.
रेखा गुप्ता ह्या सुषमा स्वराज, शीला दीक्षित आणि अतिशीनंतर दिल्लीची चौथ्या महिला मुख्यमंत्री झाल्या आहेत. यावेळी रेखा गुप्ता यांच्यासह मंत्रिमंडळातील इतर सहकाऱ्यांनीही शपथ घेतली. प्रवेश वर्मा, आशिष सूद, मनजिंदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, रवींद्र इंद्रराज आणि पंकज सिंग यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
रामलीला मैदानावर पार पडलेल्या या भव्य शपथविधी समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे वरिष्ठ नेते आणि अनेक मंत्री उपस्थित होते. या समारंभात अंदाजे ५०,००० कार्यकर्ते आणि समर्थकांची उपस्थिती होती. Delhi CM Oath Ceremony |
रेखा गुप्ता यांच्यासह एकूण सहा आमदारांना मंत्रीपदाची शपथ
१. प्रवेश वर्मा (नवी दिल्ली)
२. मनजिंदर सिंग सिरसा (राजौरी गार्डन)
३. रविंद्र कुमार इंद्रज (बवाना)
४. कपिल मिश्रा (करवाल नगर)
५. आशिष सूद (जनकपुरी)
६. पंकज कुमार सिंग (विकासपुरी)





