सहावा राज्य वित्त आयोग स्थापनेला मंजुरी, नोकरी…; मंत्रिमंडळ बैठकीतील 6 महत्त्वाचे निर्णय

Cabinet Ministers of Maharashtra | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यात सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेले सहा महत्त्वाचे निर्णय वेगवेगळ्या विभागासाठी आहेत. तसेच अंमली पदार्थ तस्करीला आळा घालण्यासाठी सरकारने नवीन टास्क फोर्स निर्मितीला मंजुरी दिली आहे. एएनटीएफ साठी एकूण 346 नवीन पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. Cabinet Ministers of Maharashtra |
मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले निर्णय
• अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सकरिता (ANTF) ३४६ नवीन पद निर्मिती व त्यासाठीच्या खर्चास मान्यता. (गृह विभाग)
• पुण्यातील दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला नाल्यावरील पुलाच्या बांधकामासाठी जमीन देण्यास मंजूरी. (महसूल विभाग)
• राज्यातील रोपवेच्या कामांसाठी राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि. (NHLML) ला आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यास मान्यता. (सार्वजनिक बांधकाम विभाग)
• म्हैसाळ उपसा सिंचन योजनेची ऊर्जा कार्यक्षमता वाढविणाऱ्या सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १ हजार ५९४ कोटींची मान्यता. या योजनेतून अवर्षण प्रवण भागात १ लाख ८ हजार १९७ हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
• जळगाव जिल्ह्यामधील चाळीसगांव तालुक्यातील वरखेडे लोंढे (बॅरेज) मध्यम प्रकल्पाच्या १ हजार २७५ कोटी ७८ लाख रुपयांच्या तरतूदीस मान्यता. चाळीसगाव, भडगाव तालुक्यातील ८ हजार २९० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा. (जलसंपदा विभाग)
• सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता. (वित्त विभाग)
हेही वाचा:
राजन साळवींनंतर आता वैभव नाईकही ठाकरेंची साथ सोडणार? भरत गोगावलेंच्या विधानानंतर चर्चांना उधाण





