अडलज (गुजरात) – देशात आता दूरसंचारची 5 जी सेवा सुरू झाली असून त्यामुळे देशातील शिक्षण क्षेत्राला याचा अधिक लाभ होईल आणि शिक्षणाचा स्तर उंचावेल (5G will revolutionize the education sector – PM Narendra Modi) असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
गांधीनगर जिल्ह्यातील अडलज शहरात गुजरात सरकारच्या मिशन स्कूल ऑफ एक्सलन्स उपक्रमाचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते.
पंतप्रधान म्हणाले की, 5 जीे सेवा स्मार्ट सुविधा, स्मार्ट क्लासरूम आणि स्मार्ट शिकवणींच्या पलीकडे जाईल. ती आपल्या शिक्षण प्रणालीला पुढील स्तरावर घेऊन जाईल. ज्यांना इंग्रजी भाषेचा त्रास जाणवतो त्यांनी स्थानिक भाषेचा वापर करावा आणि शिक्षणासाठी स्थानिक भाषांनाही प्राधान्य दिले जात आहे, असे ते म्हणाले.
अब देश में 5G बड़ा बदलाव लाने वाला है।
आज 5G, स्मार्ट सुविधाएं, स्मार्ट क्लासरूम, स्मार्ट टीचिंग से आगे बढ़कर हमारी शिक्षा व्यवस्था को Next Level पर ले जाएगा।
– पीएम @narendramodi pic.twitter.com/NoGJhm5DFS
— BJP (@BJP4India) October 19, 2022
देशात नवीन शैक्षणिक धोरण अंमलात आणण्यात आले असून त्यात इंग्रची भाषेच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्तता करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. पंतप्रधान म्हणाले की, पूर्वी, इंग्रजी भाषेचे ज्ञान हे बौद्धिक असण्याचे लक्षण मानले जात होते. पण प्रत्यक्षात इंग्रजी भाषा हे केवळ संवादाचे माध्यम आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.