तांबेंच्या तालुक्यात 59 टक्के मतदान

पदवीधर शिकलेलेच मतदानाला हुकले,
कोपरगावला केवळ 40 टक्के मतदान
कोपरगाव (प्रतिनिधी)-नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी कोपरगाव तालुक्यात केवळ 40.41 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, मात्र बहुतांश पदवीधर शिकलेल्यांनी आपला मतदानाचा हक्क हुकवला आहे.
तालुक्यात 8 हजार 464 पदवीधर मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. त्यात 5 हजार 705 पुरुष तर 2 हजार 759 महिलांचा समावेश होता. मतदारांपैकी केवळ 3 हजार 420 मतदारांनी मतदान केले. त्यात 2 हजार 554 पुरूष तर केवळ 866 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. लोकशाहीचे बिजे खोलवर रोवण्यासाठी सुशिक्षित वर्गाने पुढाकार घेण्याची गरज असते. अशिक्षित कमी शिकलेल्यांचे प्रबोधन करुन मतदानाचे महत्त्व पटवण्याची खरी जबाबदारी पदवीधर शिकलेल्यांची असताना आज तेच त्यांचा मतदानाच हक्क शंभर टक्के बजावु शकत नसल्याने पदवीधर मतदानाच्या टक्केवारीवरुन जेवढे शिकले. त्यापैकी बहुतांश मतदानाला हुकले असे म्हणण्याची वेळ आली आहे.
दरम्यान तालुक्यातील निवडणूक प्रक्रिया तहसीलदार विजय बोरूडे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मतदारांचा सकाळपासून दुपारी 2 वाजे पर्यंत उत्साह कमी होता. दुपारनंतर थोडासा वाढला. गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्यासह विविध विभागाच्या कार्यालयाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी विविध मतदान केंद्रावर तळ ठोकुन होते. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, दौलतराव जाधव यांनी संपूर्ण शहरासह तालूक्यात चोख बंदोबस्त ठेवला होता. या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी 2 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे होणार असल्याची माहीती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान तालुक्याचे आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोकराव काळे, पुष्पाताई काळे, चैताली काळे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, कोल्हे कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे, रेणुका कोल्हे, अमित कोल्हे, सुमित कोल्हे, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, राजेंद्र झावरे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
तांबेंच्या तालुक्यात 59 टक्के मतदान
संगमनेर, (प्रतिनिधी)-नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्या संगमनेर तालुक्यात 58.72 टक्के मतदान झाले. 29 हजार 115 मतदानपैकी सायंकाळी 4 वाजेपर्यंत 17 हजार 95 मतदानांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील 28 मतदान केंद्रांवर मतदान झाले.
सकाळच्या पहिल्या दोन तासांत हवेतील गारवा आणि मोठ्या प्रमाणात पसरलेले धुके यामुळे मतदानाची टक्केवारी जेमतेम होती. मात्र साडेनऊ वाजल्यानंतर सूर्यनारायणाने दर्शन दिल्याने तालुक्यासह जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या बाहेर पदवीधर व शिक्षकांच्या रांगा लागल्याचे बघायला मिळाले. सकाळी 8 वाजता मालपाणी विद्यालयायील मतदान केंद्रावर विधान परिषदेचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, उमेदवार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे, डॉ. हर्षल तांबे सपत्नीक तसेच आमदार बाळासाहेब थोरात यांच्या कन्या शरयू देशमुख यांनी मतदानाचा हक्क बजावला.
उमेदवार सत्यजित तांबे यांनी दुपारी 2 च्या सुमारास मतदानाचा हक्क बजावला. साडे तीनच्या सुमारास प्रमुख प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या उमेदवार धुळ्याच्या शुभांगी पाटील यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेट देऊन पाहणी केली. मालपाणी शाळेतील केंद्रावर मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावल्या नंतर मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. सायंकाळी साडे पाच पर्यंत शुभांगी पाटील मतदान केंद्रावर तळ ठोकून बसल्या होत्या. या दरम्यान सत्यजित तांबे यांच्या सुविद्य पत्नी डॉ. मैथिली यांनी त्यांची विचारपूस करून निवडणुकीनंतर कोणतेही वैमनस्य नसल्याचे सिद्ध केले.
दुपारी बारा वाजेपर्यंत संपूर्ण मतदारसंघात 17.20 टक्के, जिल्ह्यात 18.84 टक्के तर संगमनेर तालुक्यात 34 टक्के मतदान नोंदविले गेले चार वाजेपर्यंत संपूर्ण तालुक्याचे
58.72 टक्के मतदान झाले. श्रीरामपूर 44 टक्के मतदान
श्रीरामपूर,(प्रतिनिधी)- नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी श्रीरामपूर तालुक्यात 44. 38 टक्के मतदान झाले. एकूण 8 हजार 131 मतदार आहे. त्यात 5 हजार 421 पुरुष मतदार तर 2 हजार 710 महिला मतदार आहे. त्यापैकी 3 हजार 609 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात 2 हजार 641 पुरुष तर 968 महिलांनी मतदान केले. सकाळी 10 वाजेपर्यंत अवघे 6.3 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी 12 पर्यंत 16.75 टक्के मतदान झाले. त्यानंतर मतदानाचा वेग काहींसा वाढला. दुपारी 2 वाजेपर्यंत 29.42 टक्के मतदान झाले.
अकोलेत 50 टक्के मतदान
अकोले,(प्रतिनिधी) – नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी अकोले तालुक्यातील दहा मतदान केंद्रांवर शांततेत 50 टक्के मतदान झाले.सकाळी 8 वाजता मतदानास प्रारंभ झाला.अकोले शहरातील मराठी मुलांची शाळा, अगस्ति विद्यालय, मॉडर्न हायस्कूल अकोले तसेच तालुक्यातील वीरगाव, समशेरपूर, कोतुळ, ब्राम्हणवाडा, राजूर, साकीरवाडी, शेंडी या मतदान केंद्रांवर सकाळी 10 वाजेपर्यंत सरासरी 6 टक्के तर दुपारी 4 वाजता 49.82 म्हणजेच सरासरी 50 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.सकाळ पासून वातावरणात मोठ्या प्रमाणावर धुके असल्याने दुपारी 12 नंतर मतदार मतदानासाठी बाहेर पडले. मतदानाच्या शेवटच्या अर्ध्या तासात मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले. अनेक मतदारांचे नावे ऑनलाइन व ऑफलाईन फॉर्म भरूनही मतदार यादीत समाविष्ट झाली नाही, काहींची दुबार नावे आली, तसेच मतदान केंद्र शोध मोहिमेत काही जणांची धावपळ झाली.यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. माजी आमदार वैभवराव पिचड यांनी अकोलेसह तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्राना भेटी दिल्या. तर आमदार डॉ. किरण लहामटे यांनी राजुर मतदान केद्रावर मतदान केले. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे व महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार शुभांगी पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी बुथवर थांबून मतदारांना मतदानासाठी आवाहन करत होते. अकोले तालुक्यात या निवडणुकीसाठी एकूण 8112 मतदार होते. त्यातील 3 हजार 9 पुरुष तर 1 हजार 32 स्त्री अशा 4 हजार 41 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी प्रभारी पोलीस निरिक्षक मिथुन घुगे यांनी सर्व मतदान केद्रांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
पदवीधरसाठी 49.28 टक्के मतदान
नाशिक विभागात एकूण 338 मतदान केंद्र असून, नाशिक जिल्ह्यात एकूण 31 हजार 933, धुळे जिल्ह्यात 11 हजार 822, जळगाव जिल्ह्यात 18 हजार 33, नंदूरबार जिल्ह्यात 9 हजार 385, तर अहमदनगर जिल्ह्यात 58 हजार 283 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण मतदान 49.28 टक्के इतके झाले.
========================





