पुणे जिल्हा | लाडकी बहीण योजनेत खेडमधून 55 हजार लाभार्थी

राजगुरूनगर, (प्रतिनिधी) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या बाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी सर्व प्रशासकीय यत्रंणेशी समन्वय करून जवळपास 55 हजार महिला भगिनींना ऑनलाइन पात्र लाभार्थी करुन चागंले काम केल्याबद्दल खेड तालुका भाजपच्या वतीने तहसीलदार ज्योती देवरे यांचा गौरव करुन सत्कार केला.
यावेळी येत्या शनिवारी (दि. 17) पुणे येथे बालेवाडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सकाळी 11 वाजता या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील पात्र महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
खेड तालुक्यातील 20 हजार महिला उपस्थित राहण्याचे नियोजन शासकीय स्तरावरुन आणि पक्षीय पदाधिकार्यांच्या वतीने करण्याबाबत चर्चा यावेळी करण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष शांतारांम भोसले, कालिदास वाडेकर, राम गावडे, बाळा ठाकुर, कैलास गाळव, पाटिलबुवा गवारी आदिसह भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





