नवी दिल्ली: राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळे श्वास घेणेही कठीण झाले आहे. प्रदूषणाची गंभीर पातळी लक्षात घेऊन, ‘ग्रैप-3’ (GRAP-3) चे नियम तातडीने कडक करण्यात आले आहेत. ‘वर्क फ्रॉम होम’ला मंजुरी एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशन (CAQM) च्या निर्देशानुसार दिल्ली सरकारने खासगी कार्यालयांसाठी नवी सल्लागार सूचना जारी केली आहे. यानुसार, खासगी कार्यालयातील ५० टक्के कर्मचारी ऑन-साईट (कार्यालयात) काम करतील, तर उर्वरित ५० टक्के कर्मचाऱ्यांसाठी ‘वर्क फ्रॉम होम’ (Work From Home) बंधनकारक करण्यात आले आहे. प्रदूषणाच्या स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. नियमांची कडक अंमलबजावणी पर्यावरण मंत्री मनजिंदर सिंह सिरसा यांनी माहिती दिली की, ‘ग्रैप-3’ अंतर्गत सर्व प्रदूषण नियंत्रण उपायांवर बारकाईने लक्ष दिले जात आहे. नागरिकांनी ‘ग्रीन दिल्ली ॲप’वर तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.