नारायणगाव -करोनाच्या लढाईत अनेक दानशुर व्यक्ती व संस्था सामाजिक जबाबदारी ओळखून देशाच्या व राज्याच्या करोनापासुन सुरक्षेसाठी मदत करत आहेत. यात विरोबा नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी 5 लाख रुपयांचा धनादेश सहाय्यक निबंधक जुन्नर यांच्याकडे व नारायणगावच्या ग्रामसुरक्षा निधीसाठी 1 लाख रुपयांचा धनादेश लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे यांच्याकडे विरोबा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटे व पदाधिकारी यांच्या हस्ते सुपूर्त करण्यात आला. विरोबा पतसंस्थेने याआधीही नारायणगाव मीना नदी स्वच्छता अभियानासाठी 1 लाख रुपये, सांगली कोल्हापुर महाप्रलयाकाळात 1 लाख रुपये, दुष्काळ लढ्यासाठी स्व. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे 5 लाख रुपये यांसह विविध सामाजिक कार्यात विरोबा पतसंस्था सातत्याने कार्यरत आहे. यावेळी सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम, तलाठी नामदेव सोनवणे, सरपंच योगेश पाटे, पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटे, उपाध्यक्ष राजेंद्र बोरा, मानद सचिव राजेंद्र पाटे, संचालक रोहिदास भुजबळ, सल्लागार पांडुरंग गडदे, व्यवस्थापक सुमित पाटे, निलेश जाधव उपस्थित होते. नारायणगाव ःविरोबा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने मुख्यमंत्री सहायत्ता निधीसाठी 5 लाख व ग्रामसुरक्षा निधीसाठी 1 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.