सोलापूर – क्रुझर जीपचा टायर फुटून जीप पलटी झाल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. अक्कलकोटहून सोलापूरला जाताना हा अपघात घडला आहे. या जीपमध्ये एकून 25 प्रवाशी प्रवास करत होते.
या भीषण अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. अपघातानंतर जखमींना सोलापूर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमीपेैकी काही जणांची प्रकृती गंभीर आहे.
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. त्यामुळे प्रवासाचा सर्व भार हा खासगी वाहनांवर आला आहे. राज्यभरात खासगी वाहतूकीद्वारे प्रवाशी सेवा सुरु आहे. मात्र या खासगी वाहनांतून बेकायदेशीर वाहतूक केली जात असल्याचे चित्र आहे. प्रमाणापेक्षा जास्त प्रवाशी एकाच वाहनांतून प्रवास करताना अनेक ठिकाणी दिसून येत आहे. त्यामुळे अशा अपघाताच्या घटना समोर येत आहेत.