मुंबईमध्ये दहीहंडी दरम्यान ५१ गोविंदा जखमी

मुंबई: आज दिवसभर मुंबई सह सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जात असून त्यामध्ये एकट्या मुंबई शहरात ५१ गोविंदा दहीहंडी फोडताना जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे. या जखमी गोविंदांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काही गोविंदांची प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान मुंबई मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदाना पालिका तसेच इतर सार्वजनिक रुग्णालयाद दाखल करण्यात आले आहे. सायंकाळी [पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारी नुसार ५१ गोविंदा जखमी झाले असून त्यातील २७ गोविंदांना घरी सोडले आहे. तर उर्वरित २४ गोविंदांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

एमटी अग्रवाल हॉस्पिटल १, राजावाडी हॉस्पिटल १०, कूपर हॉस्पिटल ४, ट्रॉमा केअर हॉस्पिटल ३, व्ही. एन. देसाई हॉस्पिटल १, सायन हॉस्पिटल ४, जेजे हॉस्पिटल १, जसलोक हॉस्पिटल १, गोवंडीतील शताब्दी हॉस्पिटल २,नायर हॉस्पिटल ६, केईएम हॉस्पिटल १२, कांदिवली शताब्दी हॉस्पिटल ६ असे एकूण ५१ गोविंदा जखमी झाले आहेत.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.