इंडोचायनातील राष्ट्रांना मदत देण्याचे अमेरिकेवर नैतिक बंधन
वॉशिंग्टन, ता. 12 – अमेरिकेचे नियोजित परराष्ट्र मंत्री डॉ. हेन्री किसिंजर यांनी येथे सांगितले की, इंडोचायनातील राष्ट्रांना आर्थिक मदत देण्याचे अमेरिकेवर नैतिक बंधन आहे. अमेरिका आता अशा संक्रमण काळात आहे की,
या देशांना लष्करी मदत पुरविणे बंद करून त्यांचा लढा त्यांनाच लढू देण्यास सहाय्य करावे. निक्सन यांचे तत्त्व असे आहे की, या देशांना करावयाची लष्करी मदत उत्तरोत्तर कमी करत जावे.
सरकारी दूध कपात रद्द
पुणे – सरकारी दूध योजना पुणे यांच्या दूध ग्राहकांना कळविण्यात येत आहे की, दूध वाटपातील कपात रद्द करण्यात आली आहे. तरी ग्राहकांनी यापुढे रोज त्यांच्या दूध पत्रिकेवरील कोट्याप्रमाणे दूध घेत जावे. ज्यांनी कपात काळात योजनेशी सहकार्य केले त्याबद्दल योजना आभारी आहे. असे अधीक्षक सरकारी दूध योजना कळवितात.
इजिप्त आपल्या भूमीचा छोटा तुकडाही कोणाला देणार नाही
पॅरिस – “लेमॉंड’ या फ्रेंच पत्राला मुलाखत देताना इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांनी असे जाहीर केले की, इजिप्त आपल्या भूमीचा एकही तुकडा कोणाला देणार नाही. अध्यक्ष सादत यांनी पश्चिम आशियातील संघर्ष मिटवण्यासाठी जी 5 तत्त्वे सांगितली त्यापैकी एकाचा वर उल्लेख आहे.
1) इजिप्तला न्यायावर आधारलेली शांतता हवी आहे. 2) पॅलेस्टाइनच्या प्रश्नावर तडजोड नाही. 3) इस्रायलबरोबर त्याने इजिप्तचा प्रदेश व्यापलेला आहे. तोवर प्रत्यक्ष वाटाघाटी नाहीत. तसे करणे म्हणजे इजिप्तने शरणागती पत्करणेच होय. 4) इजिप्तला खरीखुरी शांतता हवी आहे. मात्र इस्रायल त्यासाठी अटी सांगत आहे.
आंध्र पेचप्रसंगावर चर्चा
नवी दिल्ली – वेगळ्या तेलंगणाची मागणी करणारे डॉ. चेन्ना रेड्डी यांनी संरक्षण मंत्री जगजीवनराम यांच्याशी आंध्रातील पेचप्रसंगावर चर्चा केली.