जेएनयूच्या 470 विद्यार्थ्यांना मिळणार पीएचडी
,
Updated On:

नवी दिल्ली – दिल्लीतील जेएनयू विद्यापीठाच्या पाचव्या पदवीदान समारंभात सुमारे 470 विद्यार्थ्यांना पीएचडी प्रदान केली जाणार आहे. गुरुवारी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत हा पदवीप्रदान सोहळा होणार आहे.
हा सोहळा ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या विद्यापीठाचा पहिला पदवीप्रदान सोहळा 1972 साली झाला होता, पण त्यानंतर 46 वर्षं पदवीप्रदान कार्यक्रमच तेथे घेतला गेला नव्हता, पण 2018 साली हा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्यात आला.
2019 च्या पदवी वितरण सोहळ्याच्यावेळी तेथील विद्यार्थ्यांनी फी वाढ व वसतिगृहाच्या शुल्क वाढीच्या विरोधात उग्र आंदोलन केले होते. त्यामुळे त्या वेळचे मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना सहा तास कार्यक्रम स्थळीच अडकून पडावे लागले होते.





