भारत-पाक वाटाघाटींची पहिली फेरी पूर्ण इस्लामाबाद, दि. 12 – भारत आणि पाकिस्तान यांचे नित्याचे संबंध सुरळीत व्हावेत, यासाठी आज दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांच्या वाटाघाटीस स्नेहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. वाटाघाटीच्या पहिल्या फेरीनंतर एक निवेदन काढण्यात आले. त्यानुसार टिकावू शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही देशांचे संबंध सुरळीत व्हावेत, यासाठी वाटाघाटी कराव्यात. दोन्ही देशांच्या विदेश चिटणीसांनी 45 मिनिटे चर्चा केली. या चर्चेत राजनैतिक संबंध निर्माण करण्याचा विषय व इतर प्रश्न निघाले होते. वृत्तपत्रकारांचे स्थान मोठे पुणे – सुदृढ लोकशाही व समाज परिवर्तन यासाठी लोकशिक्षण हे महत्त्वाचे कार्य आहे. हे लोकशिक्षण देण्याचे सामर्थ्य वृत्तपत्रांत आहे. त्यामुळे वृत्तपत्रकारांचे समाजात फार मोठे स्थान आहे, असे विचार मंत्री रत्नाप्पा कुंभार यांनी व्यक्त केले आहे. ग्रंथ हेच खरे मित्र वाई – ग्रंथ हे सर्वांकरिता असतात. आपल्या जीवनात ग्रंथाला महत्त्वाचे स्थान आहे. ते आपले खरे मित्र आहेत. ते आपल्याला केव्हाही उपयोगी पडतात. रेडिओ व टीव्ही यांचा खूप प्रसार झाला असला तरी ग्रंथांचे महत्त्व कमी होऊ शकत नाही, असे टिकेकर म्हणाले.