Chess Olympiad 2024 (7th Round) : भारतीय महिलांनी जॉर्जियाचा तर पुरुष संघाने चीनचा केला पराभव…

45th FIDE Chess Olympiad 2024 :- ग्रँडमास्टर आर. वैशाली आणि वंतिका अग्रवाल यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघाने 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या सातव्या फेरीत जॉर्जियाचा पराभव केला, तर जागतिक चॅम्पियनशिप चॅलेंजर डी. गुकेशच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाने चीनचा पराभव करून आपली अजेय मोहीम सुरू ठेवली.
वैशाली आणि वंतिका यांनी अनुक्रमे लैला जय आणि बेला कोटेनाश्विली यांचा पराभव केला. भारतीय महिला संघाने जॉर्जियाचा 3-1 असा तर पुरुष संघाने चीनचा 2.5-1.5 असा पराभव केला. डी. हरिकाने नाना जगनिजेसोबत खेळताना तर दिव्या देशमुखला निनो बत्सियाश्विलीसोबत खेळताना बरोबरी साधली.
भारतीय महिला संघाचे आता 14 गुण आहेत आणि पोलंड, कझाकिस्तान आणि फ्रान्स हे दोन गुणांनी मागे आहेत. खुल्या गटात गुकेशने चीनच्या वेई यीचा पराभव केला. गुकेश आणि जगज्जेता डिंग लिरेन यांच्यात होणारा सामना नोव्हेंबरमध्ये सिंगापूर येथे होणार असल्याची अटकळ होती. चीनने मात्र लिरेनला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला.
China Open 2024 : मालविकाचा विजयी धडाका सुरूच, चीन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत मारली धडक….
आर प्रज्ञानंदने व यांगी यू यांच्यातील लढत बरोबरीत राहिली. पी हरिकृष्णाला वांग युईने बरोबरीत रोखले. अर्जुन एरिगेसी आणि बु झियांगझी यांच्यातील सामनाही अनिर्णित राहिला. आता स्पर्धेच्या चार फेऱ्या बाकी आहेत. भारतानंतर इराण १३ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पुढील फेरीत भारतीय पुरुष संघाचा सामना इराणशी तर महिला संघाचा सामना पोलंडशी होणार आहे.


