पिंपरी | लोणावळा शहरात ३4 तासांत 420 मिमी पाऊस

लोणावळा, (वार्ताहर) – लोणावळा शहरात पावसाची धुव्वादार बॅटिंग सुरू आहे. शहरात मंगळवारी सकाळी 7 वाजल्यापासून ते बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 34 तासात याठिकाणी 420 मिलिमीटर पाऊस पडला असून रविवार सकाळ ते बुधवार सायंकाळ पर्यंत 3 दिवसांत तब्बल 724 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.
टाटा कंपनीच्या लोणावळा धरणाची पाणी पातळी 70.93 टक्के इतकी वाढली असून पावसाचा जोर कमी झाला नाही तर पुढील 48 तासांत धरणाच्या सांडव्यावरून अनियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग इंद्रायणी नदीपात्रात सुरू होऊ शकतो असा इशारा टाटा पॉवर कंपनीने दिला आहे.
लोणावळा शहराबरोबरच आजूबाजूच्या ग्रामीण परिसरात देखील पावसाच्या सरी वर सरी पडत असून पावसाने संपूर्ण परिसर अक्षरशः झोडपून काढला आहे. यामुळे अनेक रहिवासी भागात तसेच रस्त्यांवर पाणी साचले आहे. गत आठवड्यापासूनच लोणावळा शहरात पावसाने जोरदार हजेरी लावत लोणावळा शहराशी आपलं नात कसं आहे याची चुणूक दाखवली आहे.
मात्र या रविवार पासून पावसाचे प्रमाण जास्तच वाढलेले आहे. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याच बघायला मिळत आहे. याशिवाय शहरातील डोंगर भागातून धावत येणारे धबधबे ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शहरातील धरणांच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ होऊ लागली आहे.
टाटा कंपनीच्या लोणावळा धरणाची पाणी पातळी 70.93 टक्के इतकी वाढली असून पावसाचा जोर कमी झाला नाही तर पुढील 48 तासांत धरणाच्या सांडव्यावरून अनियंत्रित स्वरूपात पाण्याचा विसर्ग इंद्रायणी नदीपात्रात सुरू होऊ शकतो असा इशारा टाटा पॉवर कंपनीने दिला आहे.
शहरात पावसा सोबतच येथे जोराचा वारा वहात असल्याने अनेक ठिकाणी झाड देखील मोडून पडली आहे. यामुळे काही वाहनांचे नुकसान देखील झाले आहे. तर या मुसळधार पावसामुळे शालेय मुलांना शाळेत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. खरंतर थेंबभर पाऊस नसताना हवामान खात्याच्या हवेतील अंदाजावर शाळांना सुट्टी देणार प्रशासन लोणावळ्यात एवढा पाऊस पडत असताना झोपले आहे का असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.





