ढाका: सुमारे 400 रोहिंग्या शरणार्थी बांगलादेशहून स्वेच्छेने म्यानमारला परतले आहेत, असे म्यानमारच्या दूतावासाने गुरुवारी सांगितले. परंतु पूर्वीचे प्रत्यार्परणाचे प्रयत्न अयशस्वी झाले होते. त्यामुळे म्यानमारच्या दूतावासाने केलेल्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी बांगलादेशाकडून समर्थन मिळू शकले नाही. ऑगस्ट 2017 मध्ये म्यानमारच्या राखाईन राज्यात लष्कराच्या कारवाईमुळे पळून गेलेल्या 7 लाख 40 हजार रोहिंग्यांसह बांगलादेशात सुमारे 10 लाख रोहिंग्ये आहेत. “46 रोहिंग्ये स्वयंस्फूर्तीने परत आले. त्यांचे स्वागत केले गेले. यामुळे एकूण 397 रोहिंग्ये परत आले.’ अशी पोस्ट म्यानमारच्या दूतावासाने फेसबुकवर प्रसिद्ध केली आहे. परंतु काही मुठभर शरणार्थी परत आल्यामुळे राखीनमधील भू-वास्तवात काही सुधारणा झाली नाही, असे बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.